भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेंतर्गत 10 हजार सिग सउर रायफलच्या पहिल्या बॅचचा समावेश करण्यात आला आहे. या आत्युधिनक रायफलचा प्रयोग जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादीविरोधी अभियानात केला जाईल. भारताने सैनिकांना अधिक सक्षम करण्यासाठी फास्ट ट्रॅक प्रक्रियेंतर्गत 72,400 रायफल ऑर्डर केल्या आहेत.

या रायफलींना जम्मू-काश्मिरमध्ये तैनात असलेल्या सैन्याच्या उत्तर कमांडला सोपवले जाईल. सैन्याची ही कमांड जम्मू-काश्मिरमध्ये दहशवतवादी कृत्यांना सडेतोड उत्तर देते. ही रायफल जवळून मारा करणे आणि लांबून मारा करण्याच्या श्रेणीमध्ये सर्वोत्तम आहे. सरकारने सैन्यात 72,400 नवीन असॉल्ट रायफलचा समावेश करण्यासाठी 700 कोटी रुपयांचा करार केला होता. या रायफल्स अमेरिकेची शस्त्र निर्मिती कंपनी सिंग सउर द्वारे पुरवल्या जात आहेत.

 

या रायफल अमेरिकेत बनवल्या जात असून, एक वर्षांच्या आत भारतीय सैन्याला सोपवल्या जातील. या रायफल्सची खरेदी फास्ट ट्रॅकद्वारे करण्यात आलेली आहे. यातील 66 हजार रायफल्स भारतीय सैन्यासाठी आहेत. तर 2 हजार रायफल्स भारतीय नौदल आणि 4 हजार रायफल्स वायूदलासाठी आहेत. सिग सउर SIG716 7.62×51 मिमी असॉल्ट रायफल्स भारतात निर्मित  5.56×45 मिमी इंसास रायफल्सची जागा घेईल. इंसास रायफलची फायरिंग क्षमता आणि मॅग्झिन तुटण्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

 

सिग सउरशिवाय भारतीय लष्कर 7 लाखांपेक्षा अधिक एके 203 असॉल्ट रायफलचा देखील समावेश करण्याच्या तयारीत आहे. एके 203 भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रोजेक्ट अंतर्गत देशातच बनवण्यात येत आहे.

 

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: