रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दिल्ली-एनसीआर आणि चेन्नईमध्ये वॉइस ओव्हर वाय-फाय कॉलिंग सेवा सुरू केली आहे. ही सेवा सॅमसंग आणि अपल युजर्ससाठी असून, लवकरच शाओमी आणि वनप्लसच्या युजर्ससाठी देखील ही सेवा सुरू केली जाईल.

 

वॉइस ओव्हर वाय-फाय कॉलिंग सेवेचा वापर घरातील वाय-फाय कनेक्शन आणि सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉटद्वारे करता येईल. यामुळे कंपनीला मोठा फायदा होणार आहे. युजर्सला कंपनीच्या या सेवेसाठी वेगळे अप, लॉग इन अथवा नवीन नंबर घ्यावा लागणार नाही. कंपनी ही सेवा लवकरच इतर राज्यांमध्ये देखील सुरू करणार आहे.

काय आहे वाय-फाय कॉलिंग ?

वाय-फाय कॉलिंगला वॉईस ओव्हर वाय-फाय अथवा VoWiFi देखील म्हटले जाते. या फीचरमध्ये वाय-फायद्वारे तुम्ही होम वाय-फाय, पब्लिक वाय-फाय आणि वाय-फाय हॉट स्पॉटच्या मदतीने कॉलिंग करू शकता. उदाहरणार्थ, जर तुमच्या फोनमध्ये नेटवर्क नसेल तर तुम्ही कोणत्या वाय-फाय अथवा कोणाकडून हॉटस्पॉट घेऊन फोनवर आरामशीर गप्पा मारू शकता. या सेवेचा सर्वात मोठा फायदा रोमिंगचा होतो. कारण तुम्ही कोणत्याही वाय-फायद्वारे फ्रीमध्ये कॉल करू शकता.

 

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये वाय-फाय कॉलिंग सपोर्ट फीचर असेल, तरच तुम्ही याचा वापर करू शकता. फोनच्या नेटवर्क सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही तपासू शकता. सध्या सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 प्लस, वनप्लस 7टी या फोनमध्ये ही सेवा मिळत आहे. काही दिवसांपुर्वी एअरटेलने देखील ही सेवा सुरू केली आहे.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: