रिअलमीचा बहुप्रतिक्षित 5जी स्मार्टफोन रिअलमी एक्स50 स्मार्टफोन चीनच्या बाजारात लाँच झाला आहे. या फोनमध्ये दमदार प्रोसेसर आणि कॅमेरा सपोर्ट मिळेल. याशिवाय यात अँड्राईड 10 ऑपरेटिंग सिस्टम मिळेल. हा फोन भारतात कधी लाँच होणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

 

व्हेरिएंट आणि किंमत –

कंपनीने या फोनचे तीन व्हेरिएंट लाँच केले आहेत. यात 6 जीबी रॅम + 256 जीबी इंटर्नल स्टोरेज, 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटर्नल स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज मिळेल. या स्मार्टफोनच्या पहिल्या व्हेरिएंटची किंमत 2,699 युआन (28,000 रुपये), दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 2,499 युआन (जवळपास 25,800 रुपये) आणि तिसऱ्या व्हेरिएंटची किंमत 2,999 युआन (जवळपास 31 हजार रुपये) आहे.

 

स्पेसिफिकेशन –

रिअलमी एक्स50 5जी स्मार्टफोनमध्ये 6.57 इंच आयपीएस एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा 120 गीगा हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. चांगल्या परफॉर्मेंससाठी स्नॅपड्रॅगन 765 जी सपोर्ट देण्यात आला आहे.

 

कॅमेरा –

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमेरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे. सेकेंडरी कॅमेरा 16 मेगापिक्सल व इतर दोन कॅमेरे 12 आणि 8 मेगापिक्सल आहेत. सोबतच सेल्फीसाठी 16 आणि 8 मेगापिक्सल ड्युअल पंचहोल कॅमेरे मिळतील.

 

 

कनेक्टिव्हिटी फीचर्स –

कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट टाइप सी सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत. याशिवाय युजर्सला यात 4,200 एमएएच बॅटरी मिळेल. जी 30 वॉट वीओओसी 4.0 फास्ट चार्जिंग फीचर सपोर्टसह येईल.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: