अँड्रॉईड फोनमध्ये बर्‍याचदा मालवेअर किंवा व्हायरस बद्दल तक्रारी आढळतात. आता अलीकडे अशी 23 अँड्रॉइड अ‍ॅप्स ओळखली गेली आहेत, जी आपल्यासाठी खूप धोकादायक आहेत आणि हे अ‍ॅप्स हेरगिरीसाठी खास डिझाइन केले आहेत. ही सर्व अॅप्स चीनी कंपनी एचएडब्ल्यूकेने तयार केली आहेत. ही सर्व अॅप्स 382 दशलक्ष वेळा डाउनलोड केले गेले आहेत. आज आम्ही तुम्हाला या अॅप्सबद्दल सांगणार आहोत.

 

Shenzhen HAWK च्या या मालवेयर अ‍ॅप्सच्या सूचीतील पहिले अ‍ॅप आहे, ज्याने चीनमधील सर्व्हरवर कोट्यवधी वापरकर्त्यांचा डेटा पाठविला आहे. या अ‍ॅपने लोकांच्या प्रीमियम सेवेसाठी मोबाइल नंबर देखील घेतला आहे. हे अ‍ॅप गुप्तपणे ब्राउझरमधून उघडतो आणि जाहिराती प्रदर्शित करतो.

 

Shenzhen HAWKच्या अॅपमुळे यापूर्वी खळबळ उडाली आहे. हे सर्व अ‍ॅप्स अजूनही प्ले स्टोअरवर असले तरी भारतीय लष्कराला या कंपनीचे अॅप न वापरण्याचा सल्ला देण्यात आला. हे अॅप्स आवश्यक नसतानाही कॅमेरा, फोन कॉल, रेडिओ, ऑडिओ आणि वापरकर्त्यांमधील संदेशामध्ये प्रवेश करतात.

 

आता आपल्या फोनमधून Shenzhen HAWKचे कोणतेही अॅप त्वरित हटविणे आपल्यासाठी चांगले होईल. Sound Recorder हे अॅप 10 कोटी वेळा डाउनलोड केले गेले आहे, परंतु ते आपल्या फोनमध्ये असल्यास त्वरित डिलीट करा. ही अॅप्स तुमच्या फोनमध्ये तर नाही ना याची खात्री करुन घ्या.

 

Super Cleaner, Virus Cleaner 2019, File Manager, Joy Launcher, Turbo Browser (10M), Weather Forecast, Candy Selfie Camera, Hi VPN, Free VPN, Candy Gallery, Calendar Lite, Super Battery, Hi Security 2019, Net Master , Puzzle Box, Private Browser, Hi VPN Pro, World Zoo, Word Crossy!, Soccer Pinball, Dig it, Laser Break, Music Roam, Word Crush, Tap Sky, mie-alcatel.support, ViewYeah Studio, Hawk App, Hi Security, Alcatel Innovation Lab, Shenzen Hawk.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: