स्मार्टफोन कंपनी एलजीने भारतात आपला नवीन स्मार्टफोन एलजी W10 Alpha सादर केला आहे. या स्मार्टफोन किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर आणि रेन ड्रॉप नॉच सारखे फीचर देण्यात आलेले आहे. यामध्ये एलजीचा खास 2डी आर्क डिझाईन आणि ऑर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित कॅमेरा देण्यात आलेला आहे.

 

ड्युअल सिम सपोर्ट डब्ल्यू10 अल्फा स्मार्टफोनमध्ये 5.7 इंच एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिजॉल्यूशन 720×1520 आहे. डिस्प्लेमध्ये रेन ड्रॉप नॉच देण्यात आलेले आहे. फोनमध्ये 1.6 गीगाहार्ट्जचा ऑक्टाकोर प्रोसेसर देखील मिळेल. स्टोरजमध्ये कंपनीने 3 जीबी रॅम+32 जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 128जीबीपर्यंत वाढवता येईल. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात रिअरला 8 मेगापिक्सला आणि फ्रंटला सेल्फीसाठी देखील 8 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल.

 

फोनमध्ये 3,450 एमएएची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की फोनची बॅटरी 10 दिवस स्टँडबाय टाईम देते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4जी, वाय-फाय, ब्लूटूथ 4.1, जीपीएस/ ए-जीपीएस, मायक्रो-यूएसबीसारखे फीचर्स मिळतील.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: