स्मार्टफोन कंपनी इनफिनिक्सने आपला स्वस्तातला बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने हाँगकाँगमध्ये इनफिनिक्स हॉट 9 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. फोनची खास गोष्ट म्हणजे यात ट्रिपल रिअर कॅमेरा आणि दमदार बॅटरी मिळेल.

 

इनफिनिक्स हॉट 9 स्मार्टफोन 6.6 इंचाचा आयपीसी एलसीडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. फोनमध्ये हेलिओ A25 1.8GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळेल. यात हेलिओ पी35 प्रोसेसर मिळण्याची देखील शक्यता आहे. फोनमध्ये फेस अनलॉक, एआर इमोजी, एआर स्टिकरसारखे फीचर देण्यात आलेले आहेत. ड्युअल सिम सपोर्ट असणाऱ्या या फोनमध्ये 4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मिळेल.

फोन XOS 6.0 वर बेस्ड अँड्राईड 10 वर चालतो. फोनच्या डाव्या कॉर्नरला सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलेला आहे. या फोनमध्ये रेअरला 16 मेगापिक्सलचा प्रायमेरी सेंसर कॅमेरा, तसेच 2-2 मेगापिक्सलचे मॅक्रो लेंस आणि लो लाइट सेंसर कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आलेली आहे, जी 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

 

फोनच्या किंमतीबद्दल सांगायचे तर, इंडोनेशियामध्ये या फोनची किंमत 1,699,000 इंडोनेशिया रुपिआ (जवळपास 8 हजार रुपये) आहे. या फोनला भारतात व इतर बाजारामध्ये कधी लाँच केले जाईल, याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: