लॉकडाऊनच्या काळात घरात बंद असलेले लोक एकमेंकाशी संवाद साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत आहेत. मात्र लॉकडाऊनच्या काळात व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या एका महत्त्वाच्या फीचरमध्ये मोठा बदल केला आहे.


व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या स्टेट्सच्या टायमिंगमध्ये बदल केला आहे. युजर्स पुर्वी स्टेट्समध्ये 30 सेंकदांचा व्हिडीओ टाकू शकत होते. मात्र आता युजर्सला केवळ 15 सेंकदांचा व्हिडीओ टाकता येणार आहे.

 

व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात कोट्यावधी युजर्स आहेत व दररोज स्टेट्स अपडेट करतात. त्यामुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याच कारणामुळे लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर कमी करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने स्टेट्सची वेळ कमी करून 15 सेंकद केली आहे. हा बदल भारतात करण्यात आला असून, यामुळे सर्व्हरवरील दबाव कमी होईल.


याआधी फेसबुक, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम सारख्या सेवांनी देखील आपल्या एचडी व्हिडीओची क्लॉलिटी कमी करून एसडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: