आइसलँड या देशातील मुलीशी लग्न केल्यास तुम्हाला आयुष्यभर नोकरी किंवा व्यवसाय करण्याचीही गरज पडणार नाही. कारण आइसलँड सरकार येथील मुलींसोबत लग्न केल्यास त्या मुलाला प्रतिमहिना ३ लाख रूपये देते. तसेच, या लग्नासोबत या देशाचे नागरीकत्व मोफत दिले जात असल्याची माहिती आहे. मोठ्या प्रमाणावर या देशातील लोकसंख्येचे प्रमाण घटत असल्यामुळे हे पाऊल सरकारने उचलल्याचे सांगितले जात आहे.

याबाबतीत एका वेबपोर्टलने वृत्त प्रकाशित केले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सरकारच्या या ऑफरनुसार लग्न करण्यासाठी इच्छुक मुलाला आपल्या आवडीची मुलगी निवडावी लागेल. त्या मुलीनेही त्या मुलाला पसंती द्यायला हवी. तसेच, हे लग्न केल्यावर उभय पती पत्नींनी या देशाचे नागरीक म्हणून रहायला हवे. नॉर्थ अफ्रिकेच्या लोकांना या ऑफरमध्ये अधिक प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले जात आहे.

याबाबत वास्तव मात्र काही भलतेच असून याबाबत ‘‘द स्पिरिट व्हिसपर्स’ (The Spirit Whispers)’ नावाच्या इंटरनेटवरील ब्लॉगवर एका महाभागाने पहिल्यांदा लिहीले होते. त्यानंतर काही वेबसाईट्सनी त्याच्या लिखानाची दखल घेत त्याची बातमीच बनवून टाकली. एवढेच नाही तर, या वृत्तानंतर आईसलॅंडच्या मुलींनी दुसऱ्या देशातील अनोळखी मुलांना फेसबुक फ्रेण्डशीपसाठी रिक्वेस्टही पाठवायला सुरूवात केली. या सर्व गोंधळानंतर तेथील लोकांना खरेच असे वाटायला लागले की, सरकारने वास्तवातच अशी घोषणा केली आहे.

दरम्यान, सरकारने देशात वाढलेला गोंधळ पाहून स्वत:च या प्रकरणात हस्तक्षेप केला. सरकारने अधिकृतरित्या जाहीर केले की, सरकारने अशी कोणतीही घोषणा केली नाही. जगातील एक सर्वांगसुंदर पर्यटनस्थळ अशी आईसलॅंडची ओळख आहे. थंड हवेसाठी आईसलॅंड प्रसिद्ध असून, ब्लू लगून, गुलफोस, गोल्डन सर्कल अशी अने ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात.

येथील मुलीही अत्यंत सुंदर असतात. फेक न्यूज आणि फोटो यांची पडताळणी करून सत्यता तपासणाऱ्या snopes.com या वेबसाईटनेही हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. snopes.com ने दिलेल्या वृत्तानुसार आईसलॅंडमध्ये १००७ पुरूषांपाठीमागे १००० स्त्रिया असे तेथील स्त्री-पूरूषांचे प्रमाण आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: