अमेरिकेत दररोज 1.10 कोटी ते 5.50 कोटी मिटिंग्स होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. या मिटिंग्सवर कंपन्यांच्या बजेटच्या 7 ते 15 टक्के खर्च होतो. दर आठवड्याला कर्मचाऱ्यांचे 6 तास मिटिंग्समध्ये जातात. तर मॅनेजर 23 तास मिटिंग्समध्ये असतात. मिटिंगनंतर थकवा जाणवणे हे सर्वसामान्य गोष्ट आहे. मनोवैज्ञानिक याला मिटिंग रिकवरी सिंड्रोम (एमआरएस) असे म्हणतात.

 

उटाह युनिवर्सिटीचे प्रोफेसर जोसफे ए. एलेन यांचे म्हणणे आहे की, कर्मचारी जेव्हा गरजेच्या नसलेल्या मिटिंगमध्ये भाग घेतात तेव्हा त्यांच्या मेंदूची क्षमता वाया जाते. मिटिंग खूप लांबल्यावर सहनशक्ती संपते. अशावेळी मिटिंग केवळ व्याख्यान होते. वारंवार असे झाल्यावर कर्मचारी सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाही.

 

नॉर्थ कॅरोलिना युनिवर्सिटीचे प्रोफेसर क्लिफ स्कॉट हे म्हणाले की, जेव्हा कर्मचाऱ्यांना ग्रुपमध्ये मिटिंगसाठी बोलवण्यात येते. तेव्हा त्यांना कंटाळवाणे वाटते. मिटिंगमध्ये सहभागी झालेली लोक नकारातम्क असतील तर ते मिटिंगकडे दृलक्ष करतात. अशावेळी लीडरने सर्वांना लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.

 

‘द सरप्राइजिंग सायन्स ऑफ मिटिंग्स’चे लेखक स्टिव्हन रोगेलबर्ग याविषयी म्हणतात की, सतत आणि खूप वेळ चालणाऱ्या बैठकीमुळे मिटिंग रिकवरी सिंड्रोम होऊ शकतो. तुमचा टीम लीडर तुमच्या महत्त्वाच्या वेळेचा रक्षक असतो. जर त्याच्यात योग्यता असेल तर तो तुमचा वेळ वाचवू शकतो. या खूपवेळ चालणाऱ्या बैठकीमुळे लोकांना झोप येते व या मिटिंगनंतर काम पुर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम करावा लागतो.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: