लवकरच ‘चुलबुल पांडे’च्या रुपात ‘दबंग ३’मधुन बॉलिवूडचा भाईजान सलमान खान प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून सलमानने चित्रिकरण पूर्ण झाल्यानंतर एक व्हिडिओ देखील शेअर केला होता.

यापूर्वीच या चित्रपटातील सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर यांचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. आता या चित्रपटातील खलनायक अभिनेता किच्चा सुदीप याचाही लूक शेअर करण्यात आला आहे.

‘दबंग ३’मध्ये विलनच्या भूमिकेत दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप झळकणार आहे. नुकताच त्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

‘दबंग’मध्ये खलनायकाची भूमिका सोनू सुद, ‘दबंग २’मध्ये प्रकाश राज यांनी साकारली होती. तर, आता ‘दबंग ३’मध्ये किच्ची सुदीप विलन साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवाने केले आहे तर, अरबाज खानची निर्मिती आहे. हा चित्रपट २० डिसेंबरला सिनेमागृहात झळकणार आहे.                                                                                                                                                                                              


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: