26 नोव्हेंबर 2008 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. या दहशतवादी हल्ल्याला अनेक वर्ष उलटून गेली आहेत. मात्र, या हल्ल्याला आज इतकी वर्षं झाली असली तरी आजही हल्ल्याची आठवण आल्यास शरीरावर काटा येतो.

मुंबईवर झालेल्या या भीषण हल्ल्यात अनेक सामान्य लोकांचे प्राण गेले होते. तसेच 14 पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांनी देखील आपल्या प्राणाची आहूती दिली होती.

दरम्यान, याच हल्ल्याची सत्य घटना सांगणारा ‘मुंबई हॉटेल’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जेष्ठ अभिनेते ‘अनुपम खेर’ आणि देव पटेल, आर्मी हॅमर अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात दिसून येणार.

नुकताच ‘मुंबई हॉटेल’ चित्रपटाचं ऑफिशल पोस्टर रिलीज करण्यात असून, 22 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘मुंबई हॉटेल’ चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू या चार भाषांमध्ये रिलीज होईल. चित्रपटाचे दिग्दर्शन अँटनी मरास यांनी केले आहे.                                                                                                                               


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: