मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळेच वळण आले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापना होण्याच्या मार्गावर असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यानंतरी आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरच आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया आल्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. यावेळी ते म्हणाले शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले.

ते म्हणाले, छत्रपती शिवाजी मकाहाराजांनी आम्हाला ज्या दिशेने राज्य करण्याची शिकवण दिली त्यानुसार आम्ही चालतो आहोत. शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवले गरज असेल तर गनिमी कावा करा पण जनतेचे हित बघा." संजय राऊतांच्या तोंडी खंजीर खुपसण्याची भाषा अयोग्य असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले, 'सुरुवातीपासूनच स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळाले होते. जनता त्रस्त होती, शेतकरी त्रस्त होते. मात्र सेनेने आम्हाला साथ दिली नाही. त्यांनी आमच्याकडे दुसरे पर्याय उपलब्ध आहेत म्हणत सेनेने आमच्याशी दगाबाजी केली. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पहिले आहे की, संजय राऊत काय काय बोलले. जणू काही त्यांना व्हर्बल डायरिया झाला असावा. आता तरी त्यांनी सुधारावे. शिवसेनेनेला संजय राऊतांनीच फसवले आहे.'                                                                                                                                                                                          

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: