हैदराबाद येथे घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमट आहेत. आज संसंदेत देखील या घटेनेची दखल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेत सभागृहाला संबोधित केले. राजनाथ सिंह यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

 

तसेच या घटनेतील गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी.तसेच महिलांविरोधातील अशाप्रकारचे गुन्हे संपुष्टात आणण्यासाठी व त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही कठोरातील कठोर कायद्याची निर्मिती करणार असल्याचे सिंह यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणाची सुनावणीसाठी जलदगती न्यायालय करण्याचे निर्देश तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी दिले आहेत. शिवाय याप्रकरणी तीन पोलिसांना देखील निलंबित करण्यात आलेले आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने एक समिती नेमली आहे. तर केंद्र सरकारने महिलाविरोधी गुन्ह्य़ांबाबत राज्य सरकारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हैदराबादेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आली आहे.

वेळी बोलताना यांनी दिल्लीतील निर्भया प्रकारणाचा संदर्भ दिला. निर्भया प्रकरणावेळी कठोर कायदा करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही अशा घटना घडतच आहेत. त्यामुळे अशा घटनाना रोखण्यासाठी कठोर कायदा कायद्याची तरतूद कण्यासाठी आम्ही तयार असल्याच त्यांनी यावेळी सांगितले. 

 

तसेच यावेळी हैदराबादमध्ये ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच्या एक दिवस आधी तिथेच एक दुर्घटना घडली. तिथल्या सुरक्षाकर्मींना प्रश्न विचारले गेले पाहिजेत. ज्या पोलिसांनी निष्काळजीपणा केला, त्यांची नावं जाहीर केली पाहिजेत. आरोपींना जनतेसमोर ठेचून मारलं पाहिजे”, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार जया बच्चन यांनी संसदेत दिली आहे.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: