माजी सनदी अधिकारी आणि साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना पराभूत केल्यानंतर त्यांचावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण त्यांनी आता निवडूकांमध्ये यशस्वी होण्यामागचे गुपीत जाहीर केलं आहे.

 

पुण्यात स. प. महाविद्यालयात शनिवार, नारायण, सदाशिव, शुक्रवार पेठेतील ‘हिरवळ’ होती, तर बीएमसीसी म्हणजे वरड रान होते. हिरवळ म्हणली की, जनावरे येणारच की, मी हिरवळीतला जनरल सेक्रेटरी होतो. माझ्यामुळे कुणाचीही काही करायची ताकद नव्हती, त्यामुळे मुल मला पाडायचा प्रयत्न करत, तर मुली मला निवडून देत होत्या.

 

तेव्हापासून मला निवडून यायचा नादच लागला आहे.” असा  किस्सा खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितला आहे. नामदेवराव मोहोळ विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठान आणि मामासाहेब मोहोळ विद्या विकास मंडळातर्फे आयोजीत मामासाहेब मोहोळ यांच्या 37 साव्या स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते.

 

पुर्वीच्या काळी ग्रामीण भागातील लोक आर्थिक समस्येच्या चक्रव्युहात अडकले होते. त्यांना बाहेर पडता येत नव्हते. ते ओळखून मामासाहेब मोहोळ यांनी शक्ति आणि बुद्धिची सांगड घालत पुणे जिल्ह्यात शिक्षण आणि आखाड्यांचे जाळ निर्माण केल्याने ग्रामीण भागातील जनतेचे भविष्य उजळले. अस मामासाहेब मोहोळ यांच्या कार्याचा गौरव करताना श्रीनिवास पाटील म्हणाले.                                                        

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: