पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता संपूर्ण जगात पोहोचलेली आहे. परदेशात कुठेही गेले तरी मोदींच्या सभेला अफाट गर्दी पाहायला मिळते. येत्या २२ सप्टेंबरला नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेतील हस्टन शहरातील भारतीयांशी ते संवाद साधणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी हस्टनच्या रस्त्यांवर या कार्य़क्रमाचे मोठ-मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. सध्या शहरात ‘हाउडी, मोदी’ या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत ५० हजारपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी आयोजकांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

नरेंद्र मोदी यांचा हा कार्यक्रम ९० मिनिटांचा असणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात ‘वूवेन : दि इंडियन-अमेरिकन स्टोरी’ ने होणार आहे. या कार्यक्रमात सांस्कृतिक, बौद्धिक आणि सामाजिक क्षेत्रात अमेरिकेतील भारतीयांचं योगदान दाखवलं जाणर आहे. तसेच, ‘शेयर्ड ड्रीम्स, ब्राईट फ्युचर’ कार्यक्रमात अमेरिकेतील भारतीयांचं यश आणि अमेरिकेतील त्यांचं योगदान दाखवले जाणार आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी हे २०१४ पासून तिसऱ्यांदा अमेरीकेचा दौरा करणार आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये त्यांनी न्युयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर आणि २०१६ मध्ये सिलिकॉन व्हॅली येथे अमेरिकेतील भारतीयांना संबोधित केले होते.                                                         


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: