पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेवर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ अमेरिकेला फायदा होण्यासाठीच ही चर्चा केली जात असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केला आहे.

“हाऊडी मोदी’ या कार्यक्रमाची नुसती हवा केली जात आहे. पण पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेतून नक्की काय निष्पन्न होणार आहे. अमेरिकेतून अन्नपदार्थ, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची आयात करण्याबाबतच ही चर्चा होणार असल्याचे समजते आहे.

मात्र यामुळे भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात घटणार आहे. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक कमकुवत होईल. अमेरिकेचे चीनशी व्यापार युद्ध सुरू आहे. म्हणूनच अमेरिकेकडून भारताचे लांगुलचालन केले जात आहे, असा आरोपही अखिलेश यादव यांनी केला.

अमेरिकेबरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धींगत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारीच 7 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात भारतातील उद्योगांच्या संधींबाबत मोदींकडून मोठ्या संधीं शोधल्या जाणार आहेत.

                                                                                                                           

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: