मुंबई:“हा देश हिंदूंचा आहे, आपला देश हिंदू राष्ट्र आहे. हिंदू काही भाषा किंवा प्रांताचे नाव नाही, तर हे एका संस्कृतीचे नाव आहे,” या मोहन भागवतांच्या वक्तव्याला उत्तर देताना एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी वादग्रस्त ट्वीट केले आहे. भारत कधी हिंदू राष्ट्र नव्हता, नाही आणि कधीही नसेन, असं ट्वीट करुन औवेसींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना लक्ष्य केल आहे. 

“भारतातील माझ्य इतिहासाला हिंदू हे नवं नाव देत ते मिठवू शकत नाही. त्यांची ही खेळी यशस्वी ठरणार नाही. ते लोकांना जबरदस्तीने सांगू शकत नाही की, आपली संस्कृती, पंथ आणि व्यक्तीगत ओळख सर्व हिंदू धर्माने जोडलेली आहे. भारत कधी हिंदू राष्ट्र नव्हता, नाही आणि कधीही नसेन, इंशाल्लाह”, असं ट्वीट असदुद्दीन ओवैसी यांनी केले.

“मोहन भागवतांच्या हिंदू राष्ट्राच्या वक्तव्याने काही फरक पडत नाही. भागवत आम्हाला परदेशी मुस्लीसांसोबत जोडण्यासाठी खूप प्रयत्न करतात. असे प्रयत्न केल्यामुळे माझ्या भारतीयत्वावर काही परिणाम होणार नाही. हिंदू राष्ट्र हिंदू वर्चस्वासारखेच आहे, हे आम्हाला मान्य नाही. बहुसंख्याकाच्या मनाच्या मोठेपणामुळे नाही, तर आम्ही संविधानामुळे आनंदी आहोत”, असंही ट्वीट असदुद्दीन ओवैसी यांनी केल आहे.

दरम्यान हा देश हिंदूंचा आहे, आपला देश हिंदू राष्ट्र आहे. हिंदू काही भाषा किंवा प्रांताचे नाव नाही, तर हे एका संस्कृतीचे नाव आहे, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी ओडिसातील एका कार्यक्रमात केल होत.

“जगातील सर्वात सुखी मुसलमान भारतात आहेत. याचे कारण आपण हिंदू आहोत म्हणून मुसलमान खूश आहे. भारतीयांना एकत्र ठेवण्याचे काम हिंदूत्व करत आहे”, असंही भागवत म्हणाले होते.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: