ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर अॅडम गिलक्रिस्टचे मानने आहे की, ऋषभ पंतने पुढील धोनी बनण्याचा प्रयत्न करू नये. त्याने स्वतःचा खेळ सुधारण्याचा प्रयत्न करावा. धोनीसोबत पंतची तुलना होत असल्यामुळे गिलक्रिस्टने ही बाब समोर आणली.

टीममध्ये समील झाल्यापासूनच बॅटिंग, किपींग आणि खराब रिव्ह्यू घेण्यावरुन पंतवर टीका होत आहे. आताच बांग्लादेशसोबत झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताला पराभाव पत्कारावा लागला होता. त्यानंतर पंतवर खराब डीआरएस घेतल्यामुळे टीका झाली.

गिलक्रिस्टने सांगितले की, "मला असे वाटते की, भारतीयांनी पंतची तुलना धोनीसोबत करू नये. धोनीने खूप काही कमवले आहे. भविष्यात कोणीतरी येईल आणि धोनीचे विक्रम मोडित काढेल, पण त्याची शक्यता फार कमी आहे. ऋषभ खूप प्रतिभावंत खेळाडू आहे.

त्याच्या करिअरची आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे त्याच्यावर धोनीसारखी कामगिरी करण्याचा दबाव टाकू नये. पंतने धोनीकडून शिकावं, पण धोनी बनण्याचा प्रयत्न करू नये. दुसरा धोनी बनण्याऐवजी पहिला ऋषभ पंत बनाव."



మరింత సమాచారం తెలుసుకోండి: