IPL मधील गतविजेता संघ मुंबई इंडियन्स यांनी बुधवारी दोन नवे खेळाडू आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. मुंबईच्या संघात धवल कुलकर्णीची घरवापसी झाली तर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला IPL 2020 साठी मुंबईने आपल्या संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली.

राजस्थान संघातून ट्रेड करून धवल कुलकर्णीला मुंबई इंडियन्सचे तिकीट मिळाले आहे. मुंबईच्या संघाने आधी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला संघात घेतलं. त्या पाठोपाठ मराठमोळ्या धवल कुलकर्णीलाही संघात घेत संघाचा वेगवान गोलंदाजीचा ताफा अजून तगडा केला.

मुंबईकडे जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा हे दोन गुणवान गोलंदाज असताना नव्या दोन गोलंदाजांना मुंबईने का घेतले असा सवाल मुंबईच्या चाहत्यांना पडला होता. त्या प्रश्नाचं उत्तर मुंबई इंडियन्सचा Director of Cricket Operations पद भुषवणाऱ्या जहीर खानने दिले आहे. मुंबईने ट्विटर अकाऊंटवर एक Video पोस्ट केला आहे. त्यात जहीरने बोल्ट आणि कुलकर्णी यांना संघात घेण्यामागील कारण सांगितलं आहे.

मुंबईच्या संघाकडे खूप प्रतिभावान वेगवान गोलंदाज आहेत. पण हार्दिक पांड्या अजूनही पाठीच्या दुखण्यातून सावरत आहे. जसप्रीत बुमराह काही काळ जायबंदी आहे. तर जेसन बेहरेनडॉर्फदेखील दुखापतग्रस्त आहे. अशा परिस्थितीत आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत आपल्याला हवा असलेला गोलंदाज मिळणे हे किती कठीण असते याची मला पूर्ण कल्पना आहे.

त्यामुळे हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्या दुखापती लक्षात घेता आम्ही राजस्थान आणि दिल्लीच्या संघाशी ट्रेडींग करत काही खेळाडू घेतले आहेत, असे जहीर खान म्हणाला.

दरम्यान, बोल्टने २०१८ मध्ये दिल्लीसाठी १८ सामन्यात १८ बळी टिपले. त्यानंतर IPL 2019 मध्ये त्याला फारशी चांगली कामगिरी करणे शक्य झाले नाही. त्या पूर्ण हंगामात त्याने पाच सामन्यात पाच बळी टिपले.



మరింత సమాచారం తెలుసుకోండి: