भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोघांची जोडी सध्या वनडे आणि टी20मध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. सध्या कोणताही विक्रम घेतला तरी तो या दोन खेळाडूंच्या नावाशिवाय तो विक्रम पुर्णच होत नाही. असे असले तरी  इयान चॅपल यांना हे विक्रम दोन माजी महान खेळाडूंसमोर लहानच वाटतात.

 

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपलला (Ian Chappell) यांना असे वाटते की जेव्हा उच्च दर्जाच्या वेगवान गोलंदाजांची विचार करतो तेव्हा विराट- रोहितच्या तुलनेत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या जोडीसमोरील आव्हान हे नक्कीच मोठे होते.

 

“कोहली आणि रोहित हे भारताचे सर्वोत्तम वनडे क्रिकेटमधील फलंदाज आहेत, असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. परंतु तरीही सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीच्या जोडीने आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना 15 वर्षे अडचणीत आणले होते,” असे चॅपेल यांनी त्यांच्या स्तंभात म्हटले आहे.

 

यानंतर चॅपेल यांनी उदाहरणासहित समजावून सांगितले की, गांगुली आणि तेंडूलकर यांच्या काळात प्रत्येक आंतरराष्ट्रीय संघाकडे 2 उत्कृष्ट गोलंदाज होते. “गांगुली- तेंडूलकर यांनी आपला जास्तीत जास्त वेळ हा डावाची सुरूवात करताना उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांच्या जोडीसमोर घालवला आहे,” असेही चॅपेल यांनी आपल्या स्तंभात लिहिले आहे.

 

“पाकिस्तानचे वसीम अक्रम (Wasim Akram) आणि वकार यूनिस (Waqar Younis), विंडीजचे कर्टली एंब्राॅस (Curtly Ambrose) आणि कर्टनी वाॅश (Courtney Walsh), ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) आणि ब्रेट ली (Brett Lee) या गोलंदाजीच्या जोड्यांचा सामना करताना कोणत्याही फलंदाजाच्या कौशल्याची खरी परीक्षा पाहिली जातं असे.,” असेही त्यांनी अधोरेखित केले आहे.

 

“दक्षिण आफ्रिकेचे ऍलन डोनाल्ड (Allan Donald) आणि शाॅन पोलॅक (Shaun Pollock), श्रीलंकाचा लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आणि चमिंडा वास (Chaminda Vaas) याही खेळाडूंच्या गोलंदाजीचा सामना करताना कोणत्याही फलंदाजाच्या कौशल्याची खरी असायची.” 2019मध्ये वऩडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित अव्वल तर विराट दुसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यावर्षी सर्वाधिक धावा विराटने केल्या असून रोहित येथे दुसऱ्या स्थानावर आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: