भारताच्या अंतराळ मोहिमेतील मैलाचा दगड असलेल्या चांद्रयान २ मोहिमेला अखेरच्या क्षणी थोडक्यात झटका लागला. त्यामुळे अनेक दिवस उत्कंठा लागून राहिलेल्या समस्त भारतीयांसह अंतराळ संशोधन संस्थेतील (इस्रो) प्रत्येक वैज्ञानिकाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. नेहमीच चैतन्याने सळसळणाऱ्या इस्रोमध्ये काही काळासाठी सन्नाटा पसरला गेला.

इस्रो प्रमुख के. सिवन यांनी आज (ता.८) 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलताना देशवासियांना गूड न्यूज दिली. ते म्हणाले, की आम्हाला संपर्क तुटलेल्या #VikramLander ची चंद्राच्या पृष्ठभागावरील लोकेशनची माहिती मिळाली आहे. सुरक्षित असलेल्या ऑर्बिटरने विक्रम लँडरची थर्मल इमेज क्लिक केली आहे, पण अजूनही संवाद सुरू झालेला नाही.

आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच संपर्क साधला जाईल. चांद्रयान २ मोहिमेतील लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करण्यासाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी असतानाच इस्रोच्या बेंगळुरू मुख्यालयातून संपर्क तुटला गेला. दरम्यान, विक्रम लँडरचा संपर्क तुटला असला, तरी ऑर्बिटरचा संपर्क कायम आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: