WhatsApp युजर्ससाठी गुगलनं एक खूशखबर आणली आहे. लवकरच तुम्ही  गुगल असिस्टंट (Google Assistant)च्या माध्यमातून  WhatsApp व्हिडीओ कॉल आणि ऑडिओ कॉल करू शकणार आहात.  गुगल आपल्या असिस्टंटवर युजर्संना WhatsApp मेसेज (WhatsApp message) करण्याची सुविधा तशी आधीपासून उपलब्ध होती, पण आता व्हिडीओ कॉलदेखील करता येणं शक्य येणार आहे.

असं आहे नवीन फीचर

हे भन्नाट फीचर वापरण्यासाठी युजर्संना गुगल असिस्टंटला सूचना द्याव्या लागतील. उदाहरणार्थ 'Hey Google Whatsapp Video/Audio call ('सेव्ह केलेलं नाव') अशी सूचना देऊन तुम्ही व्हिडीओ कॉल करू शकता. गुगलनं आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये याबाबतची माहिती दिली आहे.

पूर्वी गुगल असिस्टंटला सूचना दिल्यानंतर व्हिडीओ कॉलिंगसाठी Google Duo आणि मोबाइल डेटाचा वापर केला जात होता. याव्यतिरिक्त जर गुगल असिस्टंटला ऑडिओ कॉलची सूचना दिल्यानंतर फोन कॉलिंग सर्व्हिसची मदत घेतली जायची. पण नवंकोरं फीचर आल्यानंतर या पद्धतींमध्ये बदल झाला आहे. युजर्संना व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलसाठी Whatsappचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

WABetaInfoने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी युजर्ससाठी एक असं भन्नाट फीचर घेऊन येत आहे, ज्याद्वारे त्यांना WhatsAppची थीम बदलता येऊ शकणार आहे.  WABetainfoच्या एका रिपोर्टनुसार,सध्या कंपनी कस्टम थीमवर काम करत आहे. यामध्ये सुरुवातीला युजर्संना मल्टिपल थीम्सचा पर्याय मिळेल. सध्या युजर्स WhatsApp च्या चॅट व्हिंडोमध्ये केवळ बॅकग्राउंड फोटो बदलू शकत आहेत. पण या नवीन फीचरमुळे तुम्ही थीमदेखील बदलू शकता.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: