चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपले बहुप्रतिक्षित स्मार्टफोन एमआय10 आणि एमआय10 प्रो अखेर लाँच केले आहेत. या दोन्ही फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 108 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. तसेच यात ऑक्टोकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट, LPDDR5 रॅम आणि UFS 3.0 स्टोरेज देण्यात आलेले आहे.

 

शाओमी एमआय 10 किंमत आणि स्पेसिफिकेशन  –

एमआय10 हा स्मार्टफोन 2 व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आलेला आहे. याच्या 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत  3,999 युआन (जवळपास 40 हजार रुपये) आहे. तर 8 जीबी + 256 जीबी व्हेरिएंट आणि12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची क्रमशः किंमत 4,299 युआन (जवळपास 43,000 रुपये) आणि 4,699 युआन (जवळपास 47,000 रुपये) आहे. हा फोन टायटेनियम सिल्वर ब्लॅक, पीच गोल्ड आणिआइस ब्लू रंगांत उपल्बध आहे. चीनमध्ये 14 फेब्रुवारीपासून विक्री सुरू होईल.

हा फोन अँड्राईड 10 वर आधारित MIUI 11 वर काम करतो. फोनमध्ये 6.67-इंचचा फुल-एचडी+ (1080 x 2340 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले कर्व्ड एमोलेड पॅनेल सोबत येतो आणि यात 1,120 निट्सचे अधिकतर ब्राइटनेस सपोर्ट करते. यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट प्रोसेसर मिळेल.

 

फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा मिळेल. याचा प्रायमेरी कॅमेरा 108 मेगापिक्सल आणि 13 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा मिळेल. अन्य दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी यात 20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 4,780 एमएएच बॅटरी मिळते. जी 30W वायर्ड चार्जिंग, 30W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते.

 

 

शाओमी एमआय10 प्रो किंमत आणि स्पेसिफिकेशन  –

एमआय 10 प्रोच्या 8 जीबी रैम और 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 4,999 युआन (जवळपास 50,000 रुपये) आहे. तर फोनच्या 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट आणि 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत क्रमश: 5,499 युआन (जवळपास 55,000 रुपये) आणि 5,999 युआन (जवळपास 60,000 रुपये) आहे. 18 फेब्रुवारीपासून या फोनची चीनमध्ये विक्री सुरू होईल.

शाओमी एमआय10 प्रो ड्युअल नॅनो सिम सपोर्ट करते. हा फोन अँड्राईड 10 वर आधारित MIUI 11 काम करतो. यामध्ये देखील एमआय10 प्रमाणेच 6.67-इंचचा फुल-एचडी+ (1080 x 2340 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले HDR10+ एमोलेड पॅनेल सोबत येतो आणि यात 1,120 निट्सचे अधिकतर ब्राइटनेस सपोर्ट करते. यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट प्रोसेसर मिळेल

 

या देखील क्वॉड रिअर कॅमेरा देण्यात आलेला आहे. ज्याचा प्रायमेरी कॅमेरा 108 मेगापिक्सल आहे. मात्र यात 20 मेगापिक्सलचा वाइड अँगल सेंसर कॅमेरा व अन्य 12 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सल टेलिफोटो लेंस मिळेल. सेल्फीसाठी फ्रंटला 20 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलेला आहे.

या फोनमध्ये 4,500 एमएएच बॅटरी देण्यात आलेली आहे. जी 50W वायर्ड चार्जिंग, 30W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिवर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट सोबत येते. कनेक्टिव्हिटीसाठी दोन्ही फोनमध्ये ड्युअल मोड 5जी आणि वाय-फाय 6 स्टँडर्ड सपोर्ट मिळेल.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: