रिसर्च एजेंसी काउंटप्वाइंटने जगभरात सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप-10 स्मार्टफोनची यादी जाहीर केली आहे. काउंटप्वाइंटने मार्कट प्लस नावाने हा रिपोर्ट सादर केला असून, यानुसार आयफोन एक्सआर हा जगातील सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन आहे. दुसऱ्या क्रमांकावर देखील अ‍ॅपलचाच आयफोन 11 हा फोन आहे.

 

सर्वाधिक विकल्या गेलेल्या आयफोन एक्सआरचे बाजारातील शेअर 3 टक्के आहे. सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप-10 फोनमध्ये अ‍ॅपलचे 6 आयफोन तर सॅमसंगच्या 4 मॉडेलचा समावेश आहे.

 

वर्ष 2019 मध्ये आयफोन एक्सआरचे 46.3 दक्षलक्ष, आयफोन 11 – 37.3 दक्षलक्ष, सॅमसंग गॅलेक्सी ए1 – 30.3 दक्षलक्ष, गॅलेक्सी ए50 – 24.2 दक्षलक्ष, गॅलेक्सी ए20 – 19.2 दक्षलक्ष, आयफोन 11 प्रो मॅक्स – 17.6 दक्षलक्ष, आयफोन 8 – 17.4 दक्षलक्ष, रेडमी नोट 7 – 16.4 दक्षलक्ष, आयफोन 11 प्रो – 15.5 दक्षलक्ष आणि गॅलेक्सी जे2 कोरच्या 15.2 दक्षलक्ष यूनिटची विक्री झाली.

 

सॅमसंगने मागील वर्षी ‘जे’ सीरिजला बंद करून नवीन ‘ए’ आणि ‘एम’ सीरिज सादर केली होती. टॉप-10 स्मार्टफोनमध्ये सॅमसंगच्या ‘गॅलेक्सी ए’ सीरिजमधील 3 स्मार्टफोनचा समावेश आहे. वर्ष 2018 मध्ये देखील टॉप 10 स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचे तीन फोन होते. तसेच अ‍ॅपलचा आयफोन 11 लाँचिंगच्या 4 महिन्यातच दुसरा सर्वाधिक विकला गेलेला स्मार्टफोन ठरला आहे.                        

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: