भारत मागील काही वर्षात ऑनलाईन व्यवहारामध्ये मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत केवळ स्मार्टफोन युजर्सलाच इंटरनेटच्या मदतीने ऑनलाईन व्यवहार करता येत होते. मात्र आता मोबाईल कंपनी लावाने फीचर फोनसाठी एक नवीन पेमेंट अ‍ॅप लाँच केले आहे.

 

या अ‍ॅपला कंपनीने लावा पे नाव दिले आहे. हे अ‍ॅप हाय सिक्युरिटी स्टँडर्ड्ससोबत येते. सोबतच हे अ‍ॅप फीचर फोन युजर्सला डिजिटल व्यवहार देखील सोपे करेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युजर्सला या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही.

 

या अ‍ॅपमध्ये युजर्सला ज्या नंबरवर पैसे पाठवायचे आहेत, तो नंबर टाकावा लागेल. यानंतर रक्कम आणि कोड टाकल्यावर व्यवहार पुर्ण होईल व दोघांनाही पैसे पोहचल्याचा मेसेज येईल. यासोबतच युजर्स अ‍ॅपद्वारे खात्यातील रक्कम देखील तपासू शकतात.

 

हे अ‍ॅप कंपनीच्या पुढील फोनमध्ये प्री-इंस्टॉल असेल. तसेच कंपनीच्या सध्याच्या फीचर फोनमध्ये हे अ‍ॅप हवे असल्यास तुम्ही सर्व्हिस सेंटरला जाऊन हे अ‍ॅप फोनमध्ये इंस्टॉल करू शकता.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: