भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे. त्यांची अवहेलना झाली, हे आम्हाला देखील आवडली नाही, अशी खंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या नेत्यांबद्दल एकनाथ खडसे यांनी उघड नाराजी दर्शविली होती. सोमवारी ते आपले मत मांडण्यासाठी दिल्लीलाही गेले होते.