मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लावला आहे. त्यामुळे देशातील बहुतेक नागरिक हे घरी बसले आहेत. त्याचा परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. तसेच, कोरोनाशी लढा देण्यासाठीही सरकारला मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो आहे.

 

त्यामुळे सरकारला मदत करण्यासाठी आणि कोरोनाला लढा देण्यासाठी आता अनेकजळ समोर येत आहेत. त्टयातच आता टाटा समूह  देखील कोरोनाशी लढा देण्यासाठी 500 कोटी रुपयांची मदत करणार आहे.


टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी ही घोषणा केली. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

 

“कोविड 19 चे संकट हे आपल्यासमोरील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूह कंपनी पूर्वीही गरजेवेळी देशाच्या कामी आली आहे. पण, या क्षणी जी गरज आहे ती नेहमीपेक्षा सर्वात जास्त आहे.”, असं ट्विट रतन टाटा यांनी केलं. यासोबत त्यांनी एक फोटोही पोस्ट केला.


टाटा ट्रस्ट फ्रंटलाइनवर काम करत असलेल्या सर्व आरोग्य कर्मचारी, टेस्टिंग किट, संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या उपचारासाठी अधिक व्यवस्था आणि  आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगसाठी 500 कोटी रुपये देईल. टाटा ट्रस्ट या महामारीला लढा देत असलेल्या त्या प्रत्येकाचा सन्मान करते, असंही टाटा ट्रस्टने सांगितलं.

 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वसामान्य लोक मदत करत आहेत. तर काही व्यावसायिक, सेलिब्रिटीही आर्थिक मदत करत आहेत.

https://mobile.twitter.com/RNTata2000/status/1243852348637605888?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1243852348637605888&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fnational%2Ftata-group-500-crore-help-to-fight-against-corona-virus-199901.html

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: